---Advertisement---

सांगलीत शेतकरी अडचणीच्या फेऱ्यात, पुन्हा अवकाळीचा तडाखा

March 20, 2026 2:18 PM
---Advertisement---

 

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सांगली,मिरज शहरासह विविध भागात होत असलेल्या पावसाचे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आलेल्या रब्बी हंगामाबरोबरच द्राक्ष हंगामाला याची झळ सोसावी लागणार आहे. अजूनही काही दिवस पाऊस सांगितल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उन्हाची तीव्रता हळूहळू वाढायला सुरू झाली असतानाच गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा परिणाम वाढत गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागात पाऊस होत आहे. पावसाने खऱ्याअर्थाने समाधानपेक्षा शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे.
यंदा चांगले पाऊसमान झाल्याने खरीपाबरोबरच रब्बी हंगामाबाबतही विशेष आशा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार यंदा गहू, हरभरासह इतर पिके चांगली हाताशी लागली आहेत. तर काही शेतकऱ्यांची पिके आता काढणीच्या मार्गावर आहेत. त्यांचा या अवकाळी पावसाचा खऱ्याअर्थाने फटका बसला आहे. यासह मिरज तालुक्यातील सोनी, खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशीसह अनेक भागात उशिरा द्राक्षे बाजारात येतात. या भागातील द्राक्ष बागायतदारांना हा पाऊस चिंता वाढवणारा ठरत आहे.
नेहमी मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण कधीच नसते. तरीही गुढी पाडव्याअगोदर पाऊस होत असतो. यंदाही गुढी पाडव्याअगोदरच पावसाने हजेरी लावली आहे. अजून कडक उन्हे पडण्यास सुरूवात होण्याअगोदरच पाऊस झाल्याने निर्सगाचाही समतोल शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत आहे. सलग तीन दिवसांच्या पावसानंतर आता परत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!