---Advertisement---

‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण आज होणार

March 23, 2026 7:23 PM
---Advertisement---

 

सांगली न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. असेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!