सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : आर्थिक वर्षाची अखेर अर्थात ३१ मार्चची तारीख आता जवळ येत आहे. त्यामुळे कर रचनेतील बदलासह इतर काही बदल स्विकारत त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यानुसार योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यास मनस्ताप होणार नाही. योग्य करपध्दती निवडून त्यासाठी योग्य त्या तज्ज्ञाचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.
आरोग्य विमामध्ये असलेली सवलत मिळवा
मार्चअगोदर आरोग्य विम्याची सदयस्थिती जाणून घ्या आणि आवश्यक असेलतर त्यात बदल करून पुढील काम करा. यासाठी असणारी सवलतीचाही लाभ घ्या.
कलम ८० सी अंतर्गत गुंतवणूक पूर्ण केली आहे का याचीही माहिती घ्या.
शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेचा नफा तोटा तपासून त्याबाबत योग्य तो सल्ला घ्या.
कोणती देणगी दिली असल्यास त्याची माहिती घेवून पुढील कार्यवाही करा.





