मंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा
सांगली न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालये जर मोफत उपचार देत नसतील तर त्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजनेबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. मोफत आरोग्य सेवांचा लाभ गरजू नागरिकांना पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने देण्यासाठी शासन प्रभावीपणे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.





