---Advertisement---

कलम १५५ च्या गैरवापर प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कडक कारवाई

March 23, 2026 8:20 PM
---Advertisement---

  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सांगली न्यूज नेटवर्क

मुंबई  : महसूल विभागात कलम १५५ च्या गैरवापरामुळे जमीन नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची शासनाने दखल घेतली असून या संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

मंत्री बावनकुळे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात 38,047 प्रकरणे आढळून आली असून त्यापैकी 2,388 प्रकरणांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत नावांमध्ये बदल, जमिनीचे क्षेत्रफळ कमी-जास्त करणे तसेच सातबारा उताऱ्यात फेरफार केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

या प्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असून राज्यातील सर्व विभागांना अशी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नोंदींचे पुनरावलोकन करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!