---Advertisement---

सांगली आयटी पार्कसाठी आरक्षित जागेच्या वाटपातील घोटाळा बाबत निवेदन

March 23, 2026 8:24 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली :  आयटी पार्कसाठी आरक्षित जागेच्या वाटपातील घोटाळ्याबाबत आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शिवाजी (भैय्या) मोहिते यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी स्थानिक तरुणांना आयटी क्षेत्रात संधी मिळावी म्हणून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाच्या बाजूला जागा राखीव ठेवली होती.

मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे आयटी पार्क विकसित न होता जागा बिल्डरांना देऊन व्यावसायिक वापरासाठी वापरण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे सांगलीतील उच्चशिक्षित तरुणांचे भवितव्य धोक्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!