---Advertisement---

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी सांगलीत ६४ टक्के मतदान

March 25, 2026 7:10 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली ;   महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठी  २३ जागांसाठी हे मतदान पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्र आणि गोवा येथील एकूण १५५ वकील उमेदवार रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यातून ह्या निवडणुकीसाठी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे व ॲड. अमोल चिमाण्णा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणुक प्रक्रिया  शांततेत पार पडली.  शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकीलांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. सांगली येथे ११३२ मतदारांपैकी ७२९, तर मिरज ५२९, ईश्वरपूर ३४८, शिराळा ६७, विटा २६०, तासगाव १४०, कवठेमहांकाळ ७३, जत १००, पलूस १०० वकीलांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा न्यायालयातील बूथवर दिवसभर वकिलांची गर्दी  होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!