---Advertisement---

खुशखबर…मुंबईत मिळकतीचे फेरफार आता ऑनलाईन

March 23, 2026 7:19 PM
---Advertisement---

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती;  ३० लाख नागरिकांना दिलासा

 

सांगली न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि  जिल्ह्यातील नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे.  मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सांगितले. यामुळे मिळकत धारकांना दिलासा मिळणार आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबई शहर व उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरणाच्या प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग व ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकती पत्रिका संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या फेरफारसाठी अर्ज करता येणार आहेत.  मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!