---Advertisement---

उद्योजकता प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण

March 23, 2026 7:27 PM
---Advertisement---

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केले.

महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील 900 महिलांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 500 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 90 लाख रूपये, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 250 महिलांच्या प्रशिक्षणासाठी यांना 45 लाख रूपये आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडील ग्रामीण भागातील 15 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 27 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 62 लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत होम डेकोर व भेट वस्तू, साडी ड्रेपिंग, मेक अप, इव्हेंट डेकोर, फॅशन ज्वेलरी डिझाईन व बुटिक व्यवसाय, दुग्धजन्य उत्पादने, मसाला व मुखवास, कॅटरिंग व लघु हॉटेल व्यवस्थापन, हस्तकला, रेझिन आर्ट, अगरबत्ती धूप इत्यादि पूजा साहित्य उत्पादन आदिंचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!