---Advertisement---

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवणार

March 23, 2026 7:31 PM
---Advertisement---

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन

सांगली न्यूज नेटवर्क

सोलापूर : राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  अशी ग्वाही   पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद  , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमाचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते  बोलत होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालांचे वस्तूचे विक्री व प्रदर्शन करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांची आर्थिक बळकटी व सक्षमीकरणासाठी हा महोत्सव घेण्यात येतो. उमेद च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांना मानाने, सन्मानाने जगता यावे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी उमेदच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!