---Advertisement---

जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

March 23, 2026 7:55 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली :  जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये 26 मार्च, 28 मार्च , 29 मार्च  व 31 मार्च  या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सर्व प्रकारचे दस्त नोंदणीचे कामकाज चालू ठेवण्यात येत आहे. तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक  प्रमोद कदम यांनी  केले आहे.

सन 2025-26 हे आर्थिक वर्ष संपत येत असल्याने तसेच नूतन वर्षानिमित्त लोकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत आहे. यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षातील इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरु ठेवण्याच्या सूचना  आहेत असेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!