मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
सांगली न्यूज नेटवर्क
मुंबई : आपत्कालीन परिस्थितींना अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः गर्भवती महिलांसारख्या संवेदनशील घटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे प्रभावी ट्रॅकिंग, वेळेवर वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्यात पावसाची व महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास आरोग्य विभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात येतात. मागील महापुराच्या काळात धाराशिव तसेच इतर प्रभावित भागांमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांनी प्रभावी नियोजन करून नागरिकांना आवश्यक त्या सेवा पुरवल्या. या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.





