जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये सहकार्य करण्याची, सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा आहे. इथे काम करत असताना अनेकांचे सहकार्य लाभले. अजून खूप काम बाकी आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. असे यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले असे फार कमी लोक असतात जे उच्च पदावर असूनही जनसामान्यांमध्ये राहून वंचित, पीडित आणि गरजू लोकांसाठी समाज हितासाठी झोकून देऊन काम करतात.अहोरात्र समाजासाठी समाजसेवा हे व्रत मानून साहेब सेवा करत आहेत.
हीच महाराष्ट्राची व मराठी मातीची महान परंपरा आहे.
यावेळी सचिव रेखा पाटील, ललिता घाडगे, सुलोचना पवार, बाळासाहेब माने, जितेंद्र भोसले, प्रकाश पाटील, राजकुमार पेडणेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा युवा विकास कल्याणकारी संस्थेच्यावतीने सत्कार
March 24, 2026 9:20 AM
---Advertisement---





