---Advertisement---

जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या १ एप्रिलला निवडी होणार

March 24, 2026 9:37 AM
---Advertisement---

पुन्हा राजकीय संघर्षाची शक्यता; इच्छूकांची मोर्चेबांधणी

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिल रोजी या निवडी होणार आहेत. यात भाजपची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे निवडी बिनविरोध होणार की राजकीय कुरघोड्या होणार हे पहावे लागणार आहे.
पुढील आठवड्यात बुधवार दि. १ रोजी या निवडी होणार आहेत. संयुक्त महाविकास आघाडीतर्फे याबाबतचा फॉर्म्यूला ठरवण्यात आला आहे. यात सर्वांनी एकजुट करत महायुतीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत पराभव केला होता. आताही असेच ठरवण्यात आले आहे. मात्र, महायुती पर्यायाने भाजप याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान,सभापती पदासाठी इच्छूक असलेल्या सदस्यांनी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!