बुके नको बुक आणा असे आवाहन
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून संजीता मोहपात्रा लवकरच पदभार स्विकारणार आहेत. येत्या बुधवारी दि. 15 एप्रिल रोजी त्या सांगलीत रुजू होतील. त्यापूर्वी सांगलीकर नागरिकांना त्यांनी एक आवाहन केले आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. संजीता मोहपात्रा यांची बदली सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
त्यांच्या या आवाहनानुसर स्वागतासाठी येताना हारतुरे किंवा बुके आणू नयेत असे आवाहन केले आहे. त्या पेक्षा पुस्तके, वह्या आणि शालेय उपयोगी साहित्य आणावे असे आवाहन त्यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे साहित्य किंवा प्रेरणादायी पुस्तके भेट द्यावीत. ही जमा झालेली सर्व पुस्तके महानगरपालिकेच्या शाळांतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व ग्रंथालयांसाठी वापरली जातील .
या अभिनव ‘पुस्तक आणि शाळे साहित्य दान’ चळवळीत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.





