---Advertisement---

महापालिका क्षेत्रात ५० नवीन सामुदायिक शौचालये

April 9, 2026 7:48 PM
---Advertisement---

स्थायी समिती सभेत निर्णय

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी विविध भागांत नवीन सामुदायिक शौचालये उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी ६९ लाख ८ हजार ४०० रुपयांच्या निविदा प्रक्रियेस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली.

या सभेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शासनाचा निधी आणि महानगरपालिकेचा हिस्सा मिळून एकूण ५० नवीन शौचालये उभारली जाणार आहेत. यासाठी ई-टेंडरद्वारे निविदा मागविण्यास आणि त्यावरील खर्चास समितीने कायदेशीर मान्यता दिली आहे. या कामासाठी शासनाचा ८७.५० लाख रुपये निधी आणि महानगरपालिकेचा ८१.५८ लाख रुपये निधी अशा एकूण निधीतून शहर स्वच्छतेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जाणार आहेत. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!