---Advertisement---

आर्थिक वर्षाची अखेर; कोषागार, उपकोषागार कार्यालये, बँका राहणार

March 25, 2026 5:17 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : आर्थिक वर्षाची अखेर अर्थात ३१ मार्चसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या कालावधीत नागरिकांना त्रास हाेवू नये यासाठीही आता नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा कोषागार, सर्व उपकोषागार,सर्व बँका मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी सर्व शासकीय आर्थिक व्यवहार सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा हा शेवटचा दिवस असल्याने शासकीय रकमेचा भरणा व कोषागारात शासकीय देयके मोठ्या प्रमाणात सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!