सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून शासनाने शुक्रवारी डॉ. मौनक घोष यांची नियुक्ती केली होती. शासन आदेशानुसार आज त्यांनी मावळते जिल्हाधिकारी अशाेक काकडे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून विकसीत सांगली जिल्हा २०३० व २०४७ हे उद्दीष्ट समोर ठेवून वाटचाल करू. जनतेच्या सहभागातून उपक्रम राबवण्यात येतील असे नुतन जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे उपस्थित होते.
नुतन जिल्हाधिकारी डॉ. घोष हे बंगालचे असून २०१९ च्या आयएएस बॅचचे ते अधिकारी आहेत. समाजातील गरजू घटकापर्यंत शासकीय सेवा सुविधा पोहोचवण्यासाठी विशेष प्राधान्य देत त्यांनी प्रभावी कामकाज यापूर्वी यवतमाळ, धाराशिव येथे केलेले आहे.
नुतन जिल्हाधिकारी डॉ. मौनक घोष यांनी पदभार स्विकारला
March 28, 2026 6:54 PM
---Advertisement---





