---Advertisement---

घाबरू नका…सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा

March 28, 2026 8:44 PM
---Advertisement---

 

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलींडरच्या वितरणाबाबत अनावश्‍यक अफवा पसरवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, जिल्ह्यात सर्व साठा पुरेसा असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यातील या साठ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात असलेल्या साठ्यानुसार एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल ५५० किलो लिटर, डिझेल ७०० किलो लिटर, बीपीसीएल पेट्रोल ९४० किलो लिटर, डिझेल १२०० किलो लिटर तर आयओसीएल कंपनीचा पेट्रोल १४९०, डिझेलचा ५१४० किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी अनावश्‍यक साठा किंवा इंधन भरण्यासाठी पंपावर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!