---Advertisement---

सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटील यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम

March 19, 2026 7:51 PM
---Advertisement---

 

संगीता पाटील अध्यक्षपदी तर ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड

सांगली जिल्हा परिषद निवडणूक झाल्यापासून भाजप पर्यायाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता मिळवण्यावरून आव्हाने, प्रतिआव्हाने देण्यात येत होती. अखेर यावर पडदा पडत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ‘संयुक्त महाविकास आघाडीच्या संगीता पाटील यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे. शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून नव्याने निवडून आलेले सदस्य सहलीवर गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महायुतीचेही सर्व सदस्य कोल्हापूरात एकत्र आले होते. त्यानंतर आज जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते सदस्यांसह दाखल झाल्याने चुरस वाढली होती. यात अध्यक्षपदासाठी संयुक्त महाविकास आघाडीतर्फे संगीता पाटील यांनी तर महायुतीतर्फे स्वप्नाली मासाळ यांनी अर्ज दाखल केले.

तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कुंडल गटातील सदस्य ऋषिकेश लाड यांनी तर महायुतीतर्फे हिंमत जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रीयेला सुरवात झाली. त्यात संगीता पाटील यांना ३४ मते मिळाली तर मासाळ यांना २५ मते मिळाली. निवड झाल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. |

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!