---Advertisement---

कंठी येथे दुचाकीवर वीज पडून तरूणाचा मृत्यू

April 22, 2026 6:39 PM
---Advertisement---

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील कंठी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी दुचाकीवरून चाललेल्या तरूणावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. आयाज फिरोज उर्फ बाळू मुजावर (रा. बाज) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र नारायण शिवाजी हाके (रा. बाज) हा थोडक्यात बचावला तर एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मृत आयाज व त्याचे मित्र मुरघास तयार करण्याचे काम करत होते. विजांचा कडकडाट आणि पावसाचीही शक्यता असल्याने ते बाजकडे दुचाकीवरून निघाले होते. याचवेळी अचानक आयाजवर वीज कोसळली. त्याला तातडीने कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, त्याचे निधन झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!