---Advertisement---

जिल्ह्यातील ३३ पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व विनंती बदल्या

April 22, 2026 6:54 PM
---Advertisement---

तत्काळ हजर होण्याचे आदेश

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३३ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्यांमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस नाईक, अंमलदारांचा समावेश आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची बदली (कंसात यापूर्वीचे ठिकाणी आणि नवीन ठिकाण) पुढीलप्रमाणे सहायक पोलिस उपनिरीक्षक अरूण औताडे (ईश्वरपूर-सांगली ग्रामीण), राजेंद्र जाधव (आष्टा शिराळा), तानाजी पवार (आष्टा मुख्यालय), सुभाष सुर्यवंशी (मुख्यालय एलसीबी), रोहिणी किर्दत (महिला कक्ष-मुख्यालय), सिमा जाधव (विश्रामबाग मुख्यालय) पोलिस हवालदार अमित परीट (तासगाव-एलसीबी), दीपक गायकवाड (कोकरूड-दहशतविरोधी पथक), सागर दबडे (सांगली शहर-मुख्यालय), राजाराम मुळे (मुख्यालय एलसीबी), पोलिस नाईक चंद्रसिंग साबळे (विटा-तासगाव) आदींचा समावेश आहे. यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचीही बदल्या झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!