---Advertisement---

मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी सांगली महापालिका सज्ज

April 23, 2026 7:29 PM
---Advertisement---

आयुक्त संजीता महापात्र यांनी घेतला सविस्तर आढावा

सांगली न्यूज नेटवर्क

सांगली : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली असून, आयुक्त संजीता मोहपात्र यांनी सर्व विभाग प्रमुखांची विशेष आढावा बैठक घेतली.
“पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत आणि आपत्ती काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे,” असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

शहरातील सर्व मोठे नाले, उपनाले आणि गटारींची सफाई ३० मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात साथरोग पसरू नये म्हणून जंतुनाशक फवारणी, मृत जनावरांच्या विल्हेवाटीचे नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स (PPE) पुरविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे २० मे पर्यंत मुुरुम टाकून बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महापालिका इमारतींची ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’ तपासून धोकादायक इमारतींबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता आणि औषधसाठा तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात पाणी साचू नये म्हणून ड्रेनेज पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जेचा धक्का लागून अपघात होऊ नये म्हणून सर्व पोल आणि विद्युत यंत्रणेचे सर्वेक्षण करून धोकादायक पोल दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या स्थलांतरासाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवणे, बोटींची उपलब्धता आणि ‘आपत्ती मित्र’ ॲपच्या माध्यमातून समन्वय साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) अश्विनी पाटील, उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) स्मृती पाटील यांच्यासह सर्व नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!