सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आता तापणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 82 रिक्त सदस्य पदांसाठी व 18 रिक्त थेट सरपंच पदासांठी निवडणूक होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे, त्या क्षेत्रांत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे.





