---Advertisement---

अभिमानास्पद…मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान

March 28, 2026 7:03 PM
---Advertisement---

ई-गव्हर्नसन्ससाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला आहे. दिडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल हा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ पध्दतीने शासकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने सेवा दिल्याने त्याचाही फायदा जनतेला होत आहे. त्यांचा हा विशेष सन्मान झाल्याबद्दल आता अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!