---Advertisement---

मिरज सभापती निवडीवरून सहाजणांना विभागीय आयुक्तांकडून नोटिसा

March 24, 2026 9:45 AM
---Advertisement---

 

सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : अभूतपूर्व गोंधळात झालेल्या मिरज पंचायत समितीतील सभापती निवडीचा विषय पुन्हा अजेंड्यावर आला आहे. अवघे तीन सदस्य असलेल्या कॉंग्रेसने सभापती पद मिळवले होते. आता भाजपच्यावतीने या विषयावर विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह सहाजणांना विभागीय आयुक्तांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.
मिरज पंचायत समितीमधील सभापती निवडीवेळी संघर्ष झाला होता. पंचायत समिती सदस्याच्या अपहरणाचीही चर्चा रंगली होती. आता निवडीवरून भाजपने थेट आयुक्तांकडे तक्रार केली आहे. कवलापूरच्या सदस्या राणी भोरे यांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार निवड प्रक्रीयेत नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यातील सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!